Mumbai On High Alert: मुंबई हाय अलर्टवर!; पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:09 PM2019-02-27T17:09:35+5:302019-02-27T17:16:22+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या बैठकीत मुंबई हाय अलर्टवर असल्याचे जारी करण्यात आले आहे.

Indian Air Strike on Pakistan: Mumbai on High Alert! Decision in the meeting of Police and Chief Minister | Mumbai On High Alert: मुंबई हाय अलर्टवर!; पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय  

Mumbai On High Alert: मुंबई हाय अलर्टवर!; पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय  

Next
ठळक मुद्दे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे.त्येक नागरिकाने देखील सतर्क राहून आजूबाजूला काही अज्ञात वस्तू आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. 

मुंबई - भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. मात्र, आपल्या 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवा, अशी मागणी जोर धरत होती. यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या बैठकीत मुंबई हाय अलर्टवर असल्याचे जारी करण्यात आले आहे. नुकतीच ही बैठक संपली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. पोलीस महासंचालकांसह अनेक पोलीस अधिकारी या बैठकीस हजर होते. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळेच खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील सतर्क राहून आजूबाजूला काही अज्ञात वस्तू आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. 

Web Title: Indian Air Strike on Pakistan: Mumbai on High Alert! Decision in the meeting of Police and Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.