हायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:56 PM2018-11-14T18:56:12+5:302018-11-14T18:56:26+5:30

याप्रकरणी जुहू पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने बलेनो कार हस्तगत केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

High Court lawyer molested; Juhu police arrested three arrested | हायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक 

हायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक 

googlenewsNext

मुंबई - मुंबई हायकोर्टाच्या महिला वकिलाच्या १९ वर्षीय मुलीची जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन बड्या बापाच्या मुलांनी छेड काढली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने बलेनो कार हस्तगत केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडित १९ वर्षीय तरुणी जुहू परिसरातून रिक्षातून आपल्या घरी जात होती. त्यावेळी तीन भामट्यांनी ती ज्या रिक्षातून प्रवास करत होती त्या रिक्षाला ओव्हरटेक केले. त्यानंतर रिक्षाचालक, पीडित तरुणी आणि तीन आरोपी यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तीन भामट्यांनी तरुणीचे फोटो टिपून तिला अश्लील स्पर्श केला. याप्रकरणी पीडित मुलीने जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात निळ्या रंगाची बलेनो कार दिसली. पोलिसांनी त्या कारचा शोध घेत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जुहू पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 354, 354(ड), 509,34 अन्वये विजय लक्ष्मण राणीम (वय-28), विकास लालचंद लोणकर (वय- 25), श्रवण संतोष लाड ( वय-24) यांना अटक करण्यात आली असून हे अंधेरी पूर्व येथील आंबेवाडीत राहणारे आहेत. 



 

Web Title: High Court lawyer molested; Juhu police arrested three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.