तरुणींना गंडवणारा एटीएसचा हॅकर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 08:23 PM2018-08-14T20:23:07+5:302018-08-14T20:35:40+5:30

shaadi.com आणि bharatmatrimony.in या संकेस्थळाद्वारे एका भामट्याने केली कल्याणमधील तरुणीची केली फसवणूक 

The hacker of the ATS hacked by the teenage girl | तरुणींना गंडवणारा एटीएसचा हॅकर गजाआड

तरुणींना गंडवणारा एटीएसचा हॅकर गजाआड

Next

कल्याण - shaadi.com आणि bharatmatrimony.in या विवाह नोंदणी संस्थांच्या संकेस्थळावरून उच्च शिक्षित तरुणींची माहिती मिळवत त्यांना संपर्क साधत आपण गुगलमध्ये इथिकल हॅकर आणि एटीएससाठी हॅकरचे काम करत असल्याचे भासवून त्यांच्याशी मैत्री करत त्यांना लग्नाचे आमिष दाखवत तरूणींकडून विविध बहाण्याने लाखो रुपये उकळणाऱ्या बंगलोरच्या ठगाला  कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनीअटक केली आहे. शुभांकर राजनारायण बॅनर्जी (वय - ३४)  असे भामट्याचे नाव असून त्याने आजतागयत अनेक तरूणींना अशा प्रकारे फसवून लाखो रुपये उकळले असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी ''लोकमत''शी बोलताना दिली. 

काही दिवसांपूर्वी महात्मा फुले पोलीस स्थानकात लग्नाचे आमिष दाखवून तसेच वडील आजारी असल्याचा बहाणा देत कल्याणमधील एका तरुणीकडून बेंगलोर येथे राहणाऱ्या शुभंकर बॅनर्जी या तरुणाने तब्बल ६ लाख ८६ हजार ९९९ रुपये उकळल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली होती. दरम्यान, शुभांकर  या तरुणीला हॉटेलमध्ये नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला व हॉटेलमधील भेटीचे फोटो व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी देखील दिली होती. अखेर या जाचाला कंटाळून या पिडीत तरुणीने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलीसांनी शुभांकर बनर्जीविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचत शुभांकरला मुंबईतून बेंगलोरला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या शुभांकरला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीने पोलीस देखील थक्क झाले. चांगल्या कुटुंबातील शुभांकर हा आयटी इंजिनियर असून shaadi.com आणि bharatmatrimony.in अशा विविह नोंदणी संस्थांच्या संकेतस्थळावरून बड्या शहरात राहणाऱ्या उच्चशिक्षित व चांगला पगार घेणाऱ्या तरुणींची माहिती मिळवायचा आणि या तरूणींना संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचा. त्यानंतर सबबी पुढे करत त्या मुलींकडून पैसे उकळत होता. यावेळी स्वतःची ओळख गुगलमध्ये इथिकल हॅकर व एटीएससाठी हॅकर म्हणून काम करत असल्याचे देत होता. त्याने अशा प्रकारे आजपर्यंत तब्बल 25 मुलींना फसवले असून फसवणूक झालेल्या तीन पिडीत मुली तक्रार देण्यासाठी समोर आल्या आहेत. या मुलींकडून त्याने एकूण  37 लाख रुपये उकळले आहेत. शुभांकरने अनेक मुलींची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने ज्या ज्या मुलींना फसवले आहे त्या पीडित तरुणींनी महात्मा फुले पोलिस स्थानकाची संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: The hacker of the ATS hacked by the teenage girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.