लग्न समारंभात नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:53 PM2019-05-29T15:53:00+5:302019-05-29T15:55:04+5:30

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी लग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

Groom's friend robbed neck lace of rupees 7 lakhs in the wedding ceremony | लग्न समारंभात नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

लग्न समारंभात नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

Next
ठळक मुद्देएका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

मुंबई - वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनीलग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
लग्नाची तयारी सुरू असताना नवरीने तिचा हार मैत्रिणीला दाखवला आणि बॅगेत ठेवला. काही वेळाने नवरी मेकअप रूममध्ये गेली तेव्हा हार गायब असल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. सगळीकडे शोध सुरू केला. मात्र हार सापडला नाही. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. अखेर, महिलेने वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
पोलिसांनी सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मेकअप रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. अखेर, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी मंगळवारी मेघा पंजाबीला अटक केली आहे. तिच्याकडून हार हस्तगत करण्यात आला आहे. हार पाहून तो तिच्या मनात भरला. त्यामुळे तिने तो चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: Groom's friend robbed neck lace of rupees 7 lakhs in the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.