शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:15 PM2019-02-20T15:15:24+5:302019-02-20T15:15:42+5:30

२ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे

Government use medicines found in medical shops | शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात

शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात

googlenewsNext

पुणे : केवळ शासकीय वापरासाठी असणारी औषधे बेकायदेशीररित्या मेडिकल दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली असून अन्न व औषध प्रशासनाने एक मेडिकल दुकानावर छापा टाकून हा प्रकार समोर आणला आहे.  
मुंढवा पोलिसांनी निरजकुमार सिंग (वय २८, रा़ स्वप्नपूर्ती सोसायटी,ससाणेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अतिश सरकाळे यांनी फिर्याद दिली आहे. निरजकुमार सिंग यांचे बी़  टी़  कवडे रोडवर रॉयल फार्मा हे कार्यालय आहे. तेथे शासकीय वापरासाठी असणाऱ्या fuviÔ 100Zg, h’vus 50Zg या औषधाच्या गोळ्यांचा साठा आढळून आला. २ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Government use medicines found in medical shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.