ठळक मुद्देकोणी नसल्याचा फायदा घेत थेट दुकानमालकाच्या मुलीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हा अपहरणाचा फसलेला डाव दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

चीन : दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत एकाने थेट दुकानमालकाच्या मुलीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर असलेल्या एका जागरुक इसमामुळे हा अपहरणाचा डाव उधळला गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हा प्रकार घडला चीनच्या डोनगान शहरातील दलांग या ठिकाणी. अपहरणाचा डाव दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका दुकानात एक लहान मुलगी स्टुलावर चढून काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. मागच्या बाजूला असलेल्या दरवाज्यातून एका इसमाने आतमध्ये डोकावून पाहिलं. आतमध्ये कोणी नाही ना याची शहानिशा केली. दुकानाच्या आत आल्यावरही त्याने चौफेर पाहत दुकानात आणखी कोणी नसल्याची खात्री करून घेतली. दुकानात या मुलीव्यतिरिक्त आणखी कोणी नसल्याची खात्री पटल्यावर त्याने त्या मुलीला मागच्या बाजूने धरलं आणि बाहेर घेऊन गेला. ती मुलगी फार रडायला लागली. हे काय घडतंय याची त्या चिमुकलीला कल्पनाच येत नव्हती. त्यामुळे तिने टाहो फोडला. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या एका इसमाला एकू गेल्याने त्याने त्या इसमाला पकडलं आणि मुलीला त्याच्या तावडीतून सोडवलं. 

व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा 

पोलिसांनी त्याला अटक केली असून ह्युयांग असं त्या आरोपीचं आडनाव असल्याचं समोर येतंय. त्याची चौकशी सुरू असून तो त्यावेळी दारुच्या नशेत असल्याचंही समोर आलंय. तसच त्यादिवशी काय काय घडलं याबाबत त्याला काहीच आठवत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुदैवाने त्या चिमुकलीला कसलीच दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे, बाकी या आरोपीने असं का केलं याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतंय.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.