मुलीचे अपहरण करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:51 AM2019-06-26T00:51:39+5:302019-06-26T00:51:50+5:30

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून २३ वर्षीय तरूणाने पळवून नेले होते.

Girl kidnapar is caught | मुलीचे अपहरण करणारा अटकेत

मुलीचे अपहरण करणारा अटकेत

Next

बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून २३ वर्षीय तरूणाने पळवून नेले होते. मोबाइल कॉल आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलिसांनी यातील आरोपीला बत्तीसशिराळा येथून अटक करून मुलीची सुटका केली आहे.
हेंद्रेपाडा भागात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीला फूस लावत राहुल अलुगुडे (२३) याने बदलापूरहून पळवून नेले होते. १६ जून रोजी ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांच्या फिर्यादीवरून राहुलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या पथकाने वेगाने सूत्रे फिरवली होती. आरोपीच्या मोबाइल क्र मांकावरून त्याचा शोध लावत पोलिसांनी बत्तीसशिराळे गाठून आरोपीला अटक केली.
सोमवारी त्याला बदलापूरमध्ये आणण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली. आरोपी हा बदलापूरमधील एका खाजगी शाळेच्या बसवर चालकाचे काम करत होता. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलांना स्कूलबसमधून पाठवायचे तरी कसे असा प्रश्न सतावत आहे.

Web Title: Girl kidnapar is caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.