A gang rape on a married woman who had gone for a walk with a friend | मित्रासोबत फिरायला गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार, चौघांना घेतले ताब्यात
मित्रासोबत फिरायला गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार, चौघांना घेतले ताब्यात

समुद्रपूर (वर्धा) - विवाहिता आपल्या मित्रासोबत फिरायला गेली असता अंधारात चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताचे दरम्यान महामार्ग ७ वरील उबदा शिवारात उघडकीस आली.
हिंगणघाट येथील पीडिता पी.व्ही. टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या मित्रासोबत दुचाकीने फिरायला गेले असता उबदा शिवारातील एका शेताजवळ थांबून बोलत होती. दरम्यान, चार आरोपींनी तिच्या मित्राला मारहाण करीत त्याचे जवळील मोबाईल व पैसे हिसकावून घेतला. त्यानंतर चौघांनी तिला शेतात नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. कुणाला जर तू सांगशील तर तुला जिवे मारू, अशी धमकी देत चौघे पसार झाले.
पीडिता व तिचा मित्र या दोघांनी रात्री समुद्रपूर पोलीस स्टेशनला गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी रोशन मसराम (२२) रा. गव्हा, चंद्रकांत कुटारकर रा. गव्हा, नंदकिशोर काळे (१८) हिंंगणघाट, सूरज बुरांडे रा. गव्हा यांना ताब्यात घेतले आहे.


 


Web Title: A gang rape on a married woman who had gone for a walk with a friend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.