फेसबूकवरील अज्ञात महिलेसोबत मैत्री पडली महागात, थाई दूतावासातील अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:35 PM2019-01-28T18:35:08+5:302019-01-28T18:37:26+5:30

डॉलरच्या नादात घर गहाण ठेवून मरियमला त्याने पैसे देण्याचे ठरविले. मरियमने भारतात येत असल्याची बतावणी करून स्वप्नीलकडून आणखी एक लाख आणि याआधीही विविध बहाण्याने एकूण दोन कोटी 53 लाख उकळले.

Friendship with unknown woman in Facebook, Thai embassy official gets 25 crores | फेसबूकवरील अज्ञात महिलेसोबत मैत्री पडली महागात, थाई दूतावासातील अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा

फेसबूकवरील अज्ञात महिलेसोबत मैत्री पडली महागात, थाई दूतावासातील अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा

Next
ठळक मुद्दे कल्याणामध्ये येताच स्वप्नील यांना मरियम खुर्शीद नावाची अमेरिकन महिलेची फेसबुकवर रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारून चॅटिंगला सुरुवात केली.डॉलरच्या नादात घर गहाण ठेवून मरियमला त्याने पैसे देण्याचे ठरविले.मरियमने भारतात येत असल्याची बतावणी करून स्वप्नीलकडून आणखी एक लाख आणि याआधीही विविध बहाण्याने एकूण दोन कोटी 53 लाख उकळले.

ठाणे - फेसबुकवरील अज्ञात महिलेची रिक्वेस्ट स्वीकारणं थाय दूतावासातील व्हिसा अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडली आहे. त्या अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा पडल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे उघडकीस आला आहे. स्वप्नील धामणकर(३५) असं अधिकाऱ्याचे नाव असून मरियम खुर्शीद या अमेरिकन महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने अडीच कोटी रुपये खर्च केले. मात्र, या बदल्यात 18 लाख अमेरिकन डॉलर हातात येण्याऐवजी स्वप्नील यांच्या हातात काळे कागद आल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

कल्याण येथील खडकपाडा भागात राहणारे स्वप्नील धामणकर मुंबईच्या थाय दूतावासात वरिष्ठ व्हिसा अधिकारी म्हणून नोकरीला आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये धामणकर पत्नी व दोन मुलांसह बँकॉक येथे थायलंडला फिरायला गेले होते. कल्याणामध्ये येताच स्वप्नील यांना मरियम खुर्शीद नावाची अमेरिकन महिलेची फेसबुकवर रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारून चॅटिंगला सुरुवात केली. मरियमने माझे पती अमेरिकन सैन्यात होते. त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर माझा दीर लग्नासाठी माझ्याकर जबरदस्ती करत असल्याचे सांगून त्याने मला तेहरानला बोलावले आहे. मात्र, मला तेहरानमध्ये न जाता भारतात यायचे आहे. त्यासाठी तुम्ही माझी मदत करा, अशी विनंती केली. यासोबतच माझ्या पतीने माझ्यासाठी 18 लाख डॉलर्स ठेवले आहेत. हे पैसे मला भारतीय चलनात कन्व्हर्ट करून द्या असं मरियमने सांगताच स्वप्नीलने मदत करण्याचे ठरवले.

डॉलरच्या नादात घर गहाण ठेवून मरियमला त्याने पैसे देण्याचे ठरविले. मरियमने भारतात येत असल्याची बतावणी करून स्वप्नीलकडून आणखी एक लाख आणि याआधीही विविध बहाण्याने एकूण दोन कोटी 53 लाख उकळले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे समजताच स्वप्नीलने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, मरियमशी चॅटिंग केल्यानंतर स्वप्नीलला ऑगस्ट 2017 मध्ये एका व्यक्तीने फोन करून कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल आले आहे. ते पार्सल घेण्यासाठी टॅक्स म्हणून ६ लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वप्नीलने दिले. त्याच दिवशी एका नायजेरियन व्यक्तीने स्वप्नील यांच्या घरी येऊन एक बॉक्स दिला. त्यामध्ये डॉलर्सची 16 काळी बंडले होती. स्कॅनिंगमध्ये पैसे दिसू नये म्हणून बंडले काळी केल्याचे नायजेरियन व्यक्तीने स्वप्नील यांना सांगून हे काढण्यासाठी 40 लाखांचे एक लिटर केमिकल व पावडर दिली. पुढे काळी बंडले पूर्ववत करण्यासाठी मरियमने पाठवलेल्या टेक्निशियनने 42 लाख रुपये घेत पाच नोटांचा रंग काढून उरलेल्या नोटा स्वप्नील यांना धुण्यास सांगितले. मात्र, टेक्निशन गेल्यानंतर नोटांचा रंग बदलत नसल्याने स्वप्नील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Friendship with unknown woman in Facebook, Thai embassy official gets 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.