चिटफंडच्या माध्यमातून पाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:22 PM2019-07-20T16:22:27+5:302019-07-20T16:23:16+5:30

वेळोवेळी पाच लाख एक हजार २५० रुपये गुंतवणूकपोटी घेऊन कोणताही परतावा दिला नाही....

Five lakh cheating through chit fund | चिटफंडच्या माध्यमातून पाच लाखांची फसवणूक

चिटफंडच्या माध्यमातून पाच लाखांची फसवणूक

googlenewsNext

पिंपरी : चांगल्या परताव्याचे आमिष देऊन चिटफंड कपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीपोटी पाच लाख एक हजार २५० रुपये घेऊन कोणताही परतावा दिला नाही. २०१५ ते जुलै २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मारुती तरस (वय ४५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विजय सोमनाथ दाते (वय ४०, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी तरस वाल्हेकरवाडी येथील अवधुत चिटफंड कंपनीचा चालक आहे. त्याने फिर्यादी दाते यांना चिटफंड कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून चांगल्या परताव्याचे आमिष दिले. त्यानुसार वेळोवेळी पाच लाख एक हजार २५० रुपये गुंतवणूकपोटी घेऊन दाते यांना कोणताही परतावा दिला नाही. तसेच भरलेले पैसेही परत न करता अपहार केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Five lakh cheating through chit fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.