उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 09:30 PM2018-11-13T21:30:03+5:302018-11-13T21:33:36+5:30

दुचाकी वाहनावरून सोलापूर महामार्गावरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरुन गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.

Firing from two places by unknown persons in Uruli kanchan | उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार 

उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार 

Next

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील तळवाडी चौकातील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापारीमल सावलदास या होलसेल कापड दुकानावर मंगळवारी (दि.१३) सायंकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला आहे. दुकानातील दर्शनी भागावर झालेल्या गोळीबारात दुकानासमोर मांडलेल्या शोभेच्या पुतळ्याला भेदून गोळी आरपार गेली आहे. त्यानंतर मुख्य गावातील नारायण मोबाईल शॉपी दुकानासमोर आणखी एक गोळी झाडत तिथून हल्लेखोर फरार झाले.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
 उरुळी कांचन मधील महात्मा गांधी विद्यालय रस्तावर व्यापारीमल सावलदास हे होलसेल कपड्याचे दालन आहे. मंगळवारी दुकानात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती. दालनात सायंकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनावरून सोलापूर महामार्गावरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरुन गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.हल्लेखोर हे २० ते २५ वर्ष वयोगटातील असून एकाने लाल रंगाचा शर्ट तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले आहे. 
ही गोेळीबाराची घटना घडल्यानंतर काहीवेळात लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या तपासात उरुळी कांचन मधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांचा हल्लात सहभाग असल्याचे पुढे येत आहे.

                
 

Web Title: Firing from two places by unknown persons in Uruli kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.