पोलिसांवर केला गुंडाने चाकूहल्ला; प्रतिकार म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंड जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 04:46 PM2018-07-23T16:46:13+5:302018-07-23T16:46:44+5:30

कुख्यात गुन्हेगार गोविंद राणावर गोळीबार

In the firing by the police as a resistance, the goons killed on the spot | पोलिसांवर केला गुंडाने चाकूहल्ला; प्रतिकार म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंड जागीच ठार

पोलिसांवर केला गुंडाने चाकूहल्ला; प्रतिकार म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंड जागीच ठार

Next

वसई -  नालासोपारा येथील तुळींज परिसरात गुंड गोविंद राणाने अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यातून आपला जीव बचावण्यासाठी पोलिसांनी झाडलेल्या गोळीत दरोडेखोर राणा मरण पावला आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून पालघर पोलिसांचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे घटनास्थळी पोहचून पाहणी करणार असल्याची माहिती सिंगे यांनी दिली. 

नालासोपारा पुर्वेच्या राधा नगर येथे सोमवारी दुपारी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे  मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ हे पोलीस जात होते. त्यावेळी त्यांना विष्णू दर्शन इमारतीजवळ गोविंद राणा हा सराईत गुन्हेगार दिसला. त्याला पकडण्यासाठी सकपाळ आणि चव्हाण पुढे गेले. मात्र, ते बेसावध असताना राणा याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. त्याला प्रत्यु्त्तर देण्यासाठी चव्हाण याने आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या राणावर झाडल्या. त्यात तो जखमी झाला. त्यााल नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राणाने केलेल्या चाकू हल्ल्यात पोलीस हवालदार मंगेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राणासोबत असलेला एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला.

 मयत राणावर चोरी, दरोडे आदी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आमच्या काही प्रकरणात तो फरार होता. आमच्या पोलिसांना तो रस्त्यात दिसल्यावर ते पकडायला गेले.वसई पोलीस ठाण्यात एका चोरीच्या गुन्ह्यात गोविंद राणा हा वॉण्टेड आरोपी होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मंगेश सकपाळ आणि त्यांचे पथक तुळींज परिसरात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोहचले असताना पोलिसांवर चाकूने जबर प्रहार राणाने केला. या हल्ल्यात सकपाळ जखमी झाले असून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बंदुकीतून राणावर गोळीबार केला. या गोळीबारात राणाचा मृत्यू झाला आहे. राणाविरोधात मुंबईसह वसईत अनेक गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सिंगे यांनी व्यक्त केली. याबाबत राणाचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Web Title: In the firing by the police as a resistance, the goons killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.