भिवंडीत चोरांचे थैमान, मोबाईल पळवून तरुणावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:51 PM2019-02-19T20:51:03+5:302019-02-19T20:52:34+5:30

कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.  

Firing of fierce thieves, firing on mobile youth, | भिवंडीत चोरांचे थैमान, मोबाईल पळवून तरुणावर गोळीबार

भिवंडीत चोरांचे थैमान, मोबाईल पळवून तरुणावर गोळीबार

Next
ठळक मुद्दे  भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत.  

भिवंडीभिवंडी शहर व ग्रामीण भागात चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.  

चोरांनी तरुणावर तीन वेळा गोळीबार केला. या गोळीबारात युवाकाला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. भिवंडीनजीकच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. कामाक्षा हा तरुण भिवंडी तालुक्यातील भादवड येथील तरे कंपाऊंड येथे एका मित्राला भेटायला जात होता. त्यावेळी एका मोटरसायकलवरून तीन चोरटे त्या ठिकाणी आले. चोरट्यांनी कामाक्षाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळ असलेला मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्या खिशातील पैशाचे पाकीटही काढून घेतले. खिशातील पैशाचे पाकिट हिसकावल्यानंतर कामाक्षाने चोरट्यांना विरोध केला असता पाच ते दहा मिनिटे त्यांच्यात बाचाबाचीही झाली. दरम्यान, एका चोरट्याने कामाक्षाला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि तिथून पळ काढू लागले. परंतु तरुणाने मोठ्या धाडसाने या चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला पकडून ठेवले होते. आपल्या साथीदाराला पकडून ठेवल्याने दुसऱ्या चोरट्याने त्याच्याजवळची बंदूक काढून तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या तरुणाच्या मांडीत लागल्या आणि  त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. स्थानिकांनी लगेच त्या तरुणाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे भिवंडी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत.  

 

Web Title: Firing of fierce thieves, firing on mobile youth,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.