अखेर वसईतून सात जण तडीपार तर 26 जणांना मनाई आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:59 PM2019-04-23T23:59:00+5:302019-04-24T00:00:02+5:30

नालासोपारा - 10 एप्रिलला निवडणुकीच्या तोंडावर एकही गुंड वसईतून तडीपार नाही या मथळ्याखाली लोकमतच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रांताधिकारी ...

Finally, seven people were tadipar from Vasai and 26 others were ordered to be not allowed | अखेर वसईतून सात जण तडीपार तर 26 जणांना मनाई आदेश

अखेर वसईतून सात जण तडीपार तर 26 जणांना मनाई आदेश

googlenewsNext

नालासोपारा - 10 एप्रिलला निवडणुकीच्या तोंडावर एकही गुंड वसईतून तडीपार नाही या मथळ्याखाली लोकमतच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात वेगाने चक्रे फिरून धूळ खात पडलेले तडीपारचे प्रस्ताव तसेच निवडणूक काळात मनाई करण्याच्या आदेश यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सोमवारी उशिरा प्रांताधिकारी प्रशांत क्षीरसागर यांनी 7 जणांना पालघर जिल्ह्यातून तडीपार केले तर 26 जणांना निवडणुकीच्या मतदानावेळी आणि मतदान मोजणी दरम्यान असे 17 दिवस मनाई आदेश काढले असून ते पालघर पोलिसांना पाठविण्यात आले आहे. 

होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कायदा सुव्यवस्था राखून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वसई विरार शहरातील सात पोलीस ठाण्यानी तीन विभागीय पोलीस उपअधीक्षक त्यांच्यामार्फत वसईच्या प्रांतअधिकाऱ्यांकडे तडीपारीसाठी 21 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामधील दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकुन झाल्यावर प्रांताधिकारी प्रशांत क्षीरसागर सागर यांनी 7 जणांना 1 वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

एक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार झालेले.... 

तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मोन्टू ऊर्फ थापा चौधरी, प्रथमेश शिवराव पवार आणि जावेद रफिक अन्सारी, वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मनोज गुलाब सिंग, पवन अभिमन्यू सिंग, नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजेश विजयशंकर यादव  आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील प्रिन्स उर्फ निलेश रमेश सिंग

मतदान व मोजणी दरम्यान मनाई आदेश लावण्यात आलेले 26 जण...

सचिन अशोक थोरात,गौरव ऊर्फ विकास लालनाथ किणी, कौशिक नारायण गावड, शनी शंकर वाघरी ऊर्फ मल, बालाजी रामराव फड, उस्मान गफूर पटेल, महेश मधूकर कुडू, संजय बिहारी ऊर्फ संजय महंतो, अमित शाम पेंढारी, अजय लालमण पांडे, बद्रीआलम आकलाक चौधरी, अंकित ऊर्फ बंटी रामअवतार यादव, रवि पंढरीनाथ आगिवले, डूंगाराम सवाराम पटेल, रूपेश वालतीन डिमेलो, चंद्रकांत रवि लोखंडे, बाबर ऊर्फ बाबा शमशाद खान, इत्तेशाम मोहमंद रफीक अन्सारी, पवन सुनिल सिंग, ऋषीकुमार राजबली सिंग, वामन कृष्णा किणी, उदय अरूण जाधव, सलीम बाबुमिया सरदार, रशिद रौफ सय्यद, गोविंदा यल्लाप्पा गुजाळकर, संजय बिहारी ऊर्फ संजय महंतो

पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावावर दोन्ही बाजूनी सुनावणी ऐकून झाल्यावर 7 जणांना 1 वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार केले आहे तर 26 जणांना निवडणुकीच्या मतदानाच्या व मोजणीच्या काळात मनाई आदेश लावला आहे. सोमवारी पालघर पोलिसांना प्रस्ताव पाठवून दिले आहे. - डॉ. दीपक क्षीरसागर (प्रांताधिकारी, वसई)

Web Title: Finally, seven people were tadipar from Vasai and 26 others were ordered to be not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.