गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळांवर गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:48 PM2018-09-24T17:48:58+5:302018-09-24T18:53:37+5:30

Filing of complaints on 202 ganapati pandals to created noise pollution during Ganeshotsav | गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळांवर गुन्हे दाखल 

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळांवर गुन्हे दाखल 

Next

मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एकूण २०२ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली.  

गणेशोत्सव कालावधीत हायकोर्टाच्या आदेशानुसर ६५ ते ७० डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या २०२ मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते  अनंत चतुर्दशीपर्यंत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे सिंगे यांनी सांगितले. ध्वनिप्रदूषण करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्याचे सिंगे म्हणाले.

Web Title: Filing of complaints on 202 ganapati pandals to created noise pollution during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.