धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:10 AM2019-06-25T04:10:51+5:302019-06-25T04:10:59+5:30

केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

The fake CBI officer who was arrested for the offense was arrested | धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले

धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले

Next

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अभिनेता अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटाची या निमित्ताने आठवण आली.

मुजफ्फरनगरमध्ये व्यावसायिक आदेश गोयल यांच्याकडे हा बनावट सीबीआय अधिकारी काही दिवस कामाला होता. या भामट्याने दाढी ठेवली होती तरी गोयल यांनी त्याला ओळखले. त्याला नंतर अटक करण्यात येऊन त्याच्याकडील सीबीआयची कागदपत्रे, बनावट ओळखपत्र व इतर दस्तावेज जप्त करण्यात आले.

हा आरोपी शनिवारी रात्री ८ वाजता मंडी पोलीस ठाण्यात आला. त्याने सीबीआयचे ओळखपत्र आणि व्यावसायिकाच्या घरी टाकायच्या छाप्याचा आदेश (सर्च वॉरंट) दाखवला. गोयल यांची उत्तराखंडमध्ये तांदळाची गिरणी आहे. हा भामटा दोन पोलीस कॉन्स्टेबल्सच्या मदतीने गोयल यांच्या घरी छाप्याची कारवाई करीत असताना गोयल यांचे अनेक शेजारी जमले व त्यांनी सीबीआय अधिकाºयाच्या संशयास्पद वर्तनाला आक्षेपही घेतला. या भामट्याचा आवाज कोणी तरी ओळखला आणि त्याची दाढी खेचताच ती निघाली व परिस्थिती चिघळली. बनावट अधिकाºयाचे नाव त्रिविंदर कुमार (रा. मुजफ्फरनगर) आहे. त्रिविंदर कुमार याच्यावर भारतीय दंडसंहितेचे कलम ४२० व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The fake CBI officer who was arrested for the offense was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.