फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:14 PM2019-03-14T15:14:16+5:302019-03-14T15:16:40+5:30

याप्रकरणी दुबईत राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

On Facebook, unknown strangers fell in love with old age | फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात

फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात

Next
ठळक मुद्देमुलाला नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा चेक महिलेकडून घेतला.आरोपीच्या पत्नीने दूरध्वनी करून महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. आरोपी पती - पत्नी खरंच दुबईत राहतात का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मुंबई - अंधेरीत एका ६० वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून १२ लाखांना गंडा घातला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. याप्रकरणी दुबईत राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंधेरी परिसरात राहणाऱ्या या महिलेची जानेवारी महिन्यात ४० वर्षीय एका व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीनं आपण दुबईतील बॅंकेत लेखापाल असल्याचं महिलेला सांगितलं. या ओळखीतून महिलेने तिच्या मुलाला दुबईत नोकरीला लावण्याची विनंती आरोपीला केली. आरोपीनंही महिलेला मुलाला नोकरीला लावण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन चॅटींग सुरू केलं. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनं महिलेला एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो पाठवण्यास सांगितले.सुरुवातीला महिलेनं नकार दिला. मात्र, कालांतराने विश्वासापोटी तिने आरोपीला आक्षेपार्ह फोटो पाठवले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आरोपी व्यक्ती महिलेला भेटण्यासाठी आली. त्याने मुलाला नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा चेक महिलेकडून घेतला.

त्यानंतर आरोपीच्या पत्नीने दूरध्वनी करून महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर पीडित महिलेचे फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत १२ लाख उकळले. त्यानंतरही आरोपीच्या पत्नीने पैशाची मागणी सुरूच ठेवली. मानसिक दबावाखाली आलेल्या पत्नीनं सर्व प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कथित दुबईत राहणाऱ्या दाम्पत्याच्या शोध घेत आहेत. आरोपी पती - पत्नी खरंच दुबईत राहतात का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.  

 

Web Title: On Facebook, unknown strangers fell in love with old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.