देवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू

By पूनम अपराज | Published: October 19, 2018 01:57 PM2018-10-19T13:57:25+5:302018-10-19T19:40:22+5:30

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टॅन्डलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

During the Goddess Dissemination, two groups of volunteers clashed, the death of a young man in the fight | देवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू

देवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू

Next

मुंबई - दादर चौपाटीजवळ काल रात्री १. ३० वाजताच्या सुमारास देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

जय भवानी मंडळाचे कार्यकर्ते देवीचा विसर्जन सोहळा पार पडून चौपाटीवरून येऊन सी ५ लेनमध्ये बाजूला उभे होते. त्यानंतर समोरून विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या जय अंबे मंडळाच्या मुलांनी बाजूला होण्यास सांगितले आणि त्यातून भांडण निर्माण झाले. रागाच्या भरात अविनाश आणि स्टँडलिन या दोघांनी रस्त्यावर पडलेल्या फुटलेल्या काचेच्या बॉटलने जगदीशच्या मानेवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात जगदीश रक्तबंबाळ झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आर्थिक अडचणीमुळे जगदीशला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान जगदीशचा मृत्यू झाला.  

काल अनेक सार्वजनिक मंडळांच्या देवीचा विसर्जन सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्याला दादर परिसरात गालबोट लागले आहे. मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणूक दादर चौपाटीवर येत असताना या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादात जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश अशोक नलावडे (वय - १९) आणि स्टॅन्डलिन यशवंत पुजारी (वय १९) यांनी बेदम मारहाण केली. ही घटना काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास सी ५ लेन येथे घडली. त्यानंतर घटनास्थळी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक पोहचले आणि गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टॅन्डलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: During the Goddess Dissemination, two groups of volunteers clashed, the death of a young man in the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.