तणावामुळे डॉक्टरच्या मुलीची १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 12:10 PM2019-01-05T12:10:26+5:302019-01-05T12:12:12+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 27 वर्षीय शर्मिष्ठा सोम या तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

Due to tension the doctor's daughter jumped from the 12th floor and committed suicide | तणावामुळे डॉक्टरच्या मुलीची १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

तणावामुळे डॉक्टरच्या मुलीची १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Next
ठळक मुद्देशर्मिष्ठा सोम (वय 27) या तरुणीने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. तणावाखाली तरुणीने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आलेलं आहे.

ठाणे - शहरातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणाऱ्या शर्मिष्ठा सोम (वय 27) या तरुणीने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 27 वर्षीय शर्मिष्ठा सोम या तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सुष्मिता ही ठाणे- मुंबईतील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कापुरबावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.  याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. केवळ अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली तरुणीने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आलेलं आहे.

Web Title: Due to tension the doctor's daughter jumped from the 12th floor and committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.