बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 01:35 PM2019-02-23T13:35:57+5:302019-02-23T13:38:55+5:30

गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच तो परीक्षेस मुकला आहे.

Due to bus accident HSC student has missed his exam | बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला

बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला

Next
ठळक मुद्दे घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर तीनहातनाका येथे सुरेश हा पायी सिग्नल क्रॉस करत असताना भरधाव वेगाने आलेल्या पुजारी याच्या बसने त्याला उडवले.छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो धोक्याबाहेर आहे.

ठाणे - एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (१९, रा. संजय गांधीनगर, नवी मुंबई) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (३६, रा. गोरेगाव, मुंबई) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच तो परीक्षेस मुकला आहे.
मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर तीनहातनाका येथे सुरेश हा पायी सिग्नल क्रॉस करत असताना भरधाव वेगाने आलेल्या पुजारी याच्या बसने त्याला उडवले. यात त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो धोक्याबाहेर आहे. मात्र, मानसिक धक्का बसल्याने तो पुढील पेपर देऊ शकेल की नाही, हे सांगता येणार नसल्याचे त्याच्यावर उपचार करणारे शेखर सुराडकर यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

Web Title: Due to bus accident HSC student has missed his exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.