Death of a youth in Ahmednagar in a two-wheeler accident in Goa | गोव्यात दुचाकी अपघातात अहमदनगरमधील युवकाचा मृत्यू 
गोव्यात दुचाकी अपघातात अहमदनगरमधील युवकाचा मृत्यू 

मडगाव: मित्राला भेटून घरी परत येत असताना दुचाकीवरून तोल गेल्याने झालेल्या अपघातात आशिष बापुसाहेब काले (38) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  दक्षिण गोवा जिल्हयातील फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीदीतील मुंगुल येथे शुक्रवारी उत्तररात्री दीडच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. मयत मूळ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी या तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या गोव्यातील मडगाव शहरातील बोर्डा येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होता.

वेर्णा येथील सिप्ला कंपनीत गेली दहा वर्षापासून तो कामाला होता अशी माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. आशिष याचे काही मित्र कोलवा येथे आले होते. त्यांना भेटून  अॅक्टिवा दुचाकीवरुन परत येत असताना वाटेत त्याला अपघात झाला. दुचाकीवरुन साधारणता दहा- पंधरा मीटर फरफटत गेल्याने त्याला गंभीर इजा पोहोचली व जागीच त्याचा मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. मयत विवाहित असून, शवचिकित्सेनंतर मृतदेह मयताच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. उपनिरीक्षक आल्वीतो रॉड्रगिस हे पुढील तपास करीत आहेत.


Web Title: Death of a youth in Ahmednagar in a two-wheeler accident in Goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.