खळबळजनक..! शीतपेयात दारू मिसळून विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 09:19 PM2019-05-10T21:19:51+5:302019-05-10T21:20:54+5:30

लग्नाच्या वाढदिवसाचा स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने विवाहितेला बोलावून तिच्यावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिसळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

danger..! Married gang rape on married women with mixed liquor in cold drinks | खळबळजनक..! शीतपेयात दारू मिसळून विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

खळबळजनक..! शीतपेयात दारू मिसळून विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

Next
ठळक मुद्देबारामती शहर परिसरातील घटना : अनोळखी युवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल 

बारामती : लग्नाच्या वाढदिवसाचा स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने विवाहितेला बोलावून तिच्यावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिसळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरात घडली आहे. या करणी बारामती तालुक्यातील बागायती गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय पीडित विवाहितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी एका युवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रेश्मा अमोल भुजबळ, अमोल बबन भुजबळ, चेतन मोरे (पूर्ण नाव माहिती नाही), काका जोगदंड (पूर्ण नाव माहिती नाही), व ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पीडित महिला ही तालुक्यातील बागायती गावात पती आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहे. बुधवारी (दि. ८) सायंकाळी ६ च्या सुमारास पीडितेची मैत्रीण रेश्मा अमोल भुजबळ (रा. तांदूळवाडी) हिने तिला फोन करून लग्नाचा वाढदिवस असल्याने जेवण बनविण्यासाठी ये, जाताना जेवण करून जा, असे सांगून बोलाविले. त्यावर पीडित महिला तांदूळवाडी परिसरातील भुजबळ याच्या घरी रात्री साडेसात वाजता गेली. तिने रेश्माला शुभेच्छा दिल्या. त्यावर त्यांनी या कार्यक्रमात जेवण द्यायचे आहे, तू स्वयंपाक करण्यास मदत कर, असे सांगितले. पीडित महिला आतील खोलीत गेल्यावर तेथे इतर बायका स्वयंपाक करत होत्या. त्यानंतर सर्वांनी जेवण केले. त्यानंतर पीडिता घरी जाण्यास निघाली. यावर रेश्माने, रात्र भरपूर झाली, तू घरी जाऊ नकोस, असे म्हणून तिचा पती अमोल बबन भुजबळ यांनी मिळून तिला शीतपेय पिण्यासाठी दिले. शीतपेय पीत असताना त्याची चव कडवट लागल्याने त्या दोघांना याबाबत तिने विचारणा केली. यावर या दांपत्याने आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने  शीतपेयात दारू टाकल्याचे सांगून काही होत नाही, तू ते पी  आणि इथेच झोप, असे सांगितले आणि ते तिला जबरदस्तीने प्यायला लावले. त्यानंतर थोड्याच वेळात चक्कर येऊ लागल्याने त्या दांपत्याने त्यांच्या घरातील एका रूममध्ये पीडितेला झोपविले. 
दुसºया दिवशी गुरुवारी (दि. ९ मे ) पहाटे साडेपाचच्या सुमारास पीडितेला जाग आली. त्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार झाला असल्याचे जाणवले. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अधिक तपास करत आहेत.

Web Title: danger..! Married gang rape on married women with mixed liquor in cold drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.