उल्हासनगरात दरोड्याचा कट उधळला, पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:13 PM2019-07-04T21:13:16+5:302019-07-04T21:14:12+5:30

विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.

Dacoity plan bursted in Ulhasnagar; five are arrested | उल्हासनगरात दरोड्याचा कट उधळला, पाच जणांना अटक 

उल्हासनगरात दरोड्याचा कट उधळला, पाच जणांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिक्षात दोन कटावनी, धारधार शस्त्र,नायलॉनची दोरी असे साहित्य आढळून आले.या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उल्हासनगर - कँम्प क्रमांक 4 येथील स्मशानभूमीजवळ दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या  टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर कँम्प नं 4 येथील स्मशानभूमी परिसरात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण विभागाचे पोलीस नाईक दिनेश पाटील आणि पोलीस शिपाई समिर गायकवाड बुधवारी मध्यरात्री  पेट्रोलिंग करित होते. त्यावेळी स्मशानभुमी समोरील रस्त्यावर  एका रिक्षामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे इसम दडून बसल्याची माहिती मिळाली. पेट्रोलिंग करणारे पाटील व गायकवाड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यावर, काही मिनिटात इतर पोलीस कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी सापळा रचून रिक्षात बसलेल्या पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यासह रिक्षाची झडती घेतली. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिक्षात दोन कटावनी, धारधार शस्त्र,नायलॉनची दोरी असे साहित्य आढळून आले.
विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केलेल्या इसमाकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी दरोड्यासाठी आल्याची कबुली दिली. आरोपींची नावे योगेशचंद्र कुलकर्णी, राहुल राय, दिनेश गायकवाड, सन्नी काळे आणि राघविंद्र दासरी अशी असून यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करित आहेत.
 

Web Title: Dacoity plan bursted in Ulhasnagar; five are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.