कर्मचा-यांच्या हजेरीची बनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:43 PM2018-11-20T18:43:42+5:302018-11-20T18:44:17+5:30

मनुष्यबळ पुरविणाऱ्या या कंपनीमध्ये आरोपी एरिया इनचार्ज म्हणून नोकरी करत होते.

creating fake bills of employees present , they fraud of 10 lakh 88 thousand rupees | कर्मचा-यांच्या हजेरीची बनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले

कर्मचा-यांच्या हजेरीची बनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : कंपनीतून काम सोडून गेलेल्या कामगारांची बनावट हजेरी तयार करून त्यांचे बील काढून त्याद्वारे मिळालेल्या १० लाख ८८ हजार रुपयांचा एका खासगी कंपनीतील एरिया इन चार्जने त्यांच्या साथीदारासह अपहार केल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
    संदिप नागुरे (वय ३८, रा.बिजलीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा रस्त्यावरील आय. एस. जी. हॉस्पीटेलीटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या एका कंपनीच्या कार्यालयात जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रोडवरील आय.एस.जी. हॉस्पिटेलिटी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या मनुष्यबळ पुरविणाऱ्या या कंपनीमध्ये दोघे आरोपी २०१४ ते २०१५ या कालावधीत शिंदेवाडी आणि शिरवळ शाखेमध्ये एरिया इनचार्ज म्हणून नोकरी करीत होते. कंपनीमध्ये कामगार भरती करणे, त्यांच्या हजेरीची नोंद करून त्यांचे पगार काढण्यासाठी हजेरीची माहिती कंपनीच्या मुख्य कार्यालयात पाठवून देण्याचे काम दोघांकडे सोपविले होते. कंपनीतून काम सोडून गेलेल्या कर्मचाºयांची दोघा आरोपींनी खोटी हजेरी तयार केली तसेच  पगार बीले काढले आणि कंपनीची तब्बल १० लाख ८८ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक एस. एन. शेख या करीत आहेत. 

Web Title: creating fake bills of employees present , they fraud of 10 lakh 88 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.