मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:54 PM2019-05-17T14:54:30+5:302019-05-17T14:55:01+5:30

या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे.

Court ordered to all accused to present in court during hearing atleast once in a week in Malegaon bomb blast case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका 

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे. 

मुंबई -  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना दणकाच दिला आहे. आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे. 

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणीसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भा. दं. वि. कलमांअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे, त्यामुळे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.



 

Web Title: Court ordered to all accused to present in court during hearing atleast once in a week in Malegaon bomb blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.