वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटकेची कणकवलीत उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:26 PM2019-01-22T13:26:15+5:302019-01-22T13:28:53+5:30

वायरल व्हिडीओ क्लिप प्रकरण; दलित समाजाबद्दलचे अपशब्द काढणं भोवले

The controversial IPS Bhagyashree took the plow to the ground | वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटकेची कणकवलीत उचलबांगडी

वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटकेची कणकवलीत उचलबांगडी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरगांबाद येथून त्यांना कणकवलीला पाठविण्यात आले असून सोमवारी गृह विभागाकडून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.आगामी निवडणूकीत त्याचा फटका बसू नये, म्हणून राज्य सरकारने अखेर त्यांना दुय्यम दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या कणकवली येथे उचलबांगडी करण्यात आली.

जमीर काझी

मुंबई - मागासवर्गीय समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उप विभागात उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरगांबाद येथून त्यांना कणकवलीला पाठविण्यात आले असून सोमवारी गृह विभागाकडून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
दरम्यान, भाग्यश्री नवटके यांची विभागीय चौकशी अद्याप पुर्ण झालेली नाही. त्याबाबतची अंतिम कारवाई अहवाल आल्यानंतर करण्यात येईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. २०१७ च्या आयपीएस बॅँचच्या अधिकारी असलेल्या पर्यवेक्षणार्थी भाग्यश्री नवटके बीड जिल्ह्यातील माजलगांव येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. गेल्यावर्षी २ डिसेंबरला त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यामध्ये कार्यालयात आलेल्या ४ - ५  जणांच्या व्यक्तीशी बोलताना ‘मी तुम्हाला खुपच कमी मारले आहे, दलित समाजातील तरुणांना किती बेदम मारहाण करते याची कल्पना नाही. मालेगावमधील मुस्लिम तरुणांनाही हिसका दाखविला आहे. त्यांचे हात व पाय फोडून काढले आहेत, त्यांना माझ्या कार्यालयात थांबवूनही घेत नाही, अट्रोसिटीच्या गुन्हे दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना हाकलून लावते, मला युपीएससीत १२५ रॅँक मिळूनही खूल्या गटातील असल्याने आयपीएसला निवड झाली. मात्र ६०० रॅँक मिळविणाऱ्यांना आयएसएची पोस्टीग मिळाली, असे वक्तव्य त्यामध्ये करण्यात आले होते. सोशल मिडीयावरुन हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठली होती. दलित व मुस्लिम समाजाला ‘टार्गेट’ करण्याच्या तिच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारची बदनामी होत असल्याने त्यांची तातडीने गुप्त वार्ता विभागाच्या औरंगाबाद येथे बदली करण्यात आली. मात्र त्यामुळे त्यांच्या वर्तनावर फारसा फरक पडला नसल्याची चर्चा दलित समाजाकडून करण्यात येत होती. आगामी निवडणूकीत त्याचा फटका बसू नये, म्हणून राज्य सरकारने अखेर त्यांना दुय्यम दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या कणकवली येथे उचलबांगडी करण्यात आली.

नाशिक आयजीकडून चौकशी सुरु
व्हिडीओ क्लिपमध्ये भाग्यश्री नवटके या दलित व मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्यांना तातडीने बीड येथून एसआयडीला हलविण्यात आले. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी नाशिक परिश्रेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून चौकशीचा अद्याप अहवाल आला नसल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाच सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
वादग्रस्त अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याबरोबरच गृह विभागाने सोमवारी पाच सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांची नावे अशी (कंसात कोठून - कोठे) : विजयकुमार पळसुले (नक्षल विरोधी अभियान, नागपूर- गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), रविंद्र गिड्डे (बदली आदेशाधीन माणगांव- नवी मुंबई), पोपट दडस ( एसआरपी,जलना- एसआरपी,दौंड), मोहम्मद युनुस काद्री ( एसआरपी नागपूर-एसआरपी पुणे), अनिल भोपे (वायरलेस विभाग, नागपूर- प्रशिक्षण केंद्र, पुणे)

 

 

Web Title: The controversial IPS Bhagyashree took the plow to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.