पोलिसांच्या कॉम्बॅट व्हॅनने दुचाकीला दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:04 PM2019-04-16T22:04:33+5:302019-04-16T23:05:42+5:30

पोलीस नाईक शेळकेला अटक केली असून जामिनावर मुक्तता केली

The Combat van of the police beat the two bikes | पोलिसांच्या कॉम्बॅट व्हॅनने दुचाकीला दिली धडक

पोलिसांच्या कॉम्बॅट व्हॅनने दुचाकीला दिली धडक

Next

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उत्तरवाहिनी दिशेने पोलिसांच्या कॉम्बॅट व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. कॉम्बॅट व्हॅन पोलीस नाईक राजेश रमेश शेळके (४५) हे चालवत होते. वाहन चालवताना शेळके यांनी मद्यपान केले असल्याने ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा काळाचौकी पोलीस ठाण्यात  दाखल करून पोलीस नाईक शेळकेला अटक केली असून जामिनावर मुक्तता केली  असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

जखमी दुचाकीस्वाराला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले असल्याची माहिती पुढे लाड यांनी दिली आहे. 

Web Title: The Combat van of the police beat the two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.