गरोदर महिलेचा पाठलाग करणाऱ्या भामट्याने नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:17 PM2018-09-18T21:17:15+5:302018-09-18T21:17:55+5:30

मिराजहुसेन सिराज अहमद असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सिराज विरोधात ३५४ (ड) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. 

The citizens who followed the pregnant woman handed the police to the police | गरोदर महिलेचा पाठलाग करणाऱ्या भामट्याने नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली 

गरोदर महिलेचा पाठलाग करणाऱ्या भामट्याने नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली 

Next

मुंबई - लोकमान्य टिळक पोलिस मार्ग परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय गर्भवती महिलेची छेड काढून तिचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास लोकमान्य टिळक पोलिसांनी अटक केली आहे. मिराजहुसेन सिराज अहमद असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सिराज विरोधात ३५४ (ड) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. 

चिराबाजारच्या पालेकर मार्गावर पिडित महिला ही गर्भवती असल्यामुळे माहेरी आल्या होत्या.  पीडित महिला ही गर्भवती असल्यामुळे दररोज चालण्यासाठी सकाळी ७ वा. जे.एस.एस.के रोड ते कोलबाट लेट या कमी वर्दळीच्या ठिकाणी जातात. १६ सप्टेंबर रोजी त्या नेहमी प्रमाणे आते भाऊ संजय ओव्हळ याच्यासोबत माॅर्निंग वाॅक करत असताना. सिराज हा त्याचा पाठलाग करत होता. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने महिलाला मागून हाक मारण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने आरडा ओरड केल्यानंतर पुढे चालत असलेल्या आतेभाऊ संजयने त्याला पकडले. तोपर्यंत परिसरातील इतर नागरिक देखील संजयच्या मदतीस धावून आले. नागरिकांनी सिराजला लोकमान्य टिळक पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी सिराज विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The citizens who followed the pregnant woman handed the police to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.