The child's unfortunate death by falling into the water tank | पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू
पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

खामगाव - येथे पाण्याच्या टाकीत बुडून एका ५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६ ते ७ वाजण्याच्यादरम्यान घडली. विजय भागवतकर हे खामगाव शहरातील संजीवनी कॉलनी भागात राहतात. त्यांचा ५ वर्षाचा मुलगाआज त्यांच्या घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडला. आदित्य विजय भागवतकर असे पाण्याच्या टाकीत पडलेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना लक्षात येताच बालकाला टाकीतून बाहेर काढून सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेमुळे संजीवनी कॉलनीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत खामगाव शहर पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 


Web Title: The child's unfortunate death by falling into the water tank
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.