मुलांना अमानुष मारहाणः 'हे' आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 08:08 PM2018-07-19T20:08:19+5:302018-07-19T20:15:15+5:30

सौदी अरेबिया सरकारने या घटनेची दखल घेत काल आरोपी आईला बेड्या ठोकत दोन चिमुकल्या मुलींची सुटका केली

The children are inhumanly beaten up: 'this' is the truth of the viral video | मुलांना अमानुष मारहाणः 'हे' आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

मुलांना अमानुष मारहाणः 'हे' आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Next

मुंबई - दोन चिमुकल्या मुलींना अमानुष मारहाण करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. हा व्हिडिओ नेमका कुठला ? असा प्रश्न अनेकांना पडला. या व्हिडिओचा पाठपुरावा करत 'लोकमत'ने या वायरल व्हिडिओमागचे सत्य शोधून काढले आहे. हा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडिओ आहे सौदी अरेबियातील जेदाहमधील. स्वतःच्या पोटचा गोळा असलेल्या जुळ्या चिमुकल्यांना हृदयद्रावक मारहाण आईने केली आहे. हा व्हिडिओ सौदी अरेबियातील एका क्रूर आईनेच घटस्फोटानंतर पतीकडून पैसे मिळविण्यासाठी बळजबरी करण्यासाठी चित्रीकरण केला होता.या व्हिडिओमुळे  संपूर्ण सोशल मीडियावर जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. सौदी अरेबिया सरकारने या घटनेची दाखल घेत काल आरोपी आईला बेड्या ठोकत दोन चिमुकल्या मुलींची सुटका केली आहे. 

आज सोशल मीडियावर या मन हेलावून सोडणाऱ्या हृदयद्रावक व्हिडिओने मातृत्वाला काळिमा फसला आहे. हा व्हिडिओ खूप ट्रोल देखील झाला आहे आणि कारवाईची मागणी देखील अनेकांनी केली आहे. हा हादरून टाकणारा व्हिडिओ आहे सौदी अरेबियातला. आरोपी महिला सोमाली असून तिने येमानी नागरिकांशी लग्न केले होते.

दोघांच्या संसाराचा गाडा ठीक सुरु होता. जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, काही दिवसांनी त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर पैश्यांची चणचण भासत असल्याने पतीला पैसे देण्यास बळजबरी करण्यासाठी आरोपी महिने सहा महिन्यांच्या चिमुरड्या मुलींचा हृदय पिळवटून काढेल अशी मारहाण करणारा व्हिडिओ काढला आणि तो पतीला पाठवला. त्यानंतर पतीला ओळखत असलेल्या मोहनाद अल हशदी या येमानी नागरिकाने हा व्हिडिओ वायरल केला आणि मदत मागितली. या व्हिडिओची दखल सौदीच्या कामगार आणि सामाजिक विकास मंत्रालयाने दोन चिमुकल्यांची जेदाहमधून सुटका केली. रुग्णालयात वैद्यकीय उपचार करून वडिलांकडे सुपूर्द केले. तसेच आरोपी आईला अटक केली असल्याचे ट्वीट सौदीचे सरकारचे प्रवक्ते खालिद अबा खैल यांनी केले आहे. 

Web Title: The children are inhumanly beaten up: 'this' is the truth of the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.