खंडणीप्रकरणी तोतया पत्रकाराला बेड्या; वर्तक नगर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 01:30 PM2018-11-21T13:30:41+5:302018-11-21T13:32:15+5:30

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून एका व्यापाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या कथित आरटीआय कार्यकर्ता आणी तोतया पत्रकार महेंद्रसिंग सोनी याला वर्तक नगर पोलीसांनी अटक केली आहे.

Chattis for the racket; Vartak Nagar police action | खंडणीप्रकरणी तोतया पत्रकाराला बेड्या; वर्तक नगर पोलिसांची कारवाई

खंडणीप्रकरणी तोतया पत्रकाराला बेड्या; वर्तक नगर पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देमाहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून एका व्यापाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या कथित आरटीआय कार्यकर्ता आणी तोतया पत्रकार महेंद्रसिंग सोनी याला वर्तक नगर पोलीसांनी अटक केली आहे. धमकी देऊन त्याला घाबरवून त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले होतेभाजीवाले, गॅरेजवाले, पानटपरिवाले, फळवाले यांना माहिती अधिकाराचा धाक दाखवून हप्ते गोळा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

ठाणे - तोतया पत्रकार आणी आरटीआय कार्यकर्ता महेंद्र सिंग सोनी याला खंडणी मागितल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून एका व्यापाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या कथित आरटीआय कार्यकर्ता आणी तोतया पत्रकार महेंद्रसिंग सोनी याला वर्तक नगर पोलीसांनी अटक केली आहे.

आरोपीने तक्रारदार  व्यापाऱ्याकडून एका महिन्यापूर्वी तुझी मंत्रालयात तक्रार करेन माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून तुझा व्यवसाय बंद करेन अशी धमकी देऊन त्याला घाबरवून त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले होते आणि दर महिन्याला पाच हजार रुपयांची मागणी केली होती , त्याप्रमाणे काल दहा वाजता त्याने परत व्यापराकडे पाच हजारची मागणी केली व धंदा बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर कंटाळून पीडित व्यापाऱ्याने वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यामुळे तसेच भाजीवाले, गॅरेजवाले, पानटपरिवाले, फळवाले यांना माहिती अधिकाराचा धाक दाखवून हप्ते गोळा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, घाबरून कोणी तक्रार करायला पुढे येत नव्हतं. व्यापाराच्या तक्रारीनंतर रात्री एक वाजता पोलिसांनी आरोपी महेंद्रसिंग सोनी याला भा.दं. वि. कलम 384,385,386 प्रमाणे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Chattis for the racket; Vartak Nagar police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.