८० लाखांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 07:54 PM2019-01-22T19:54:14+5:302019-01-22T19:59:00+5:30

या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Charges for RTI activist demanding ransom of Rs 80 lakh | ८० लाखांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला बेड्या

८० लाखांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला बेड्या

Next
ठळक मुद्दे 80 लाखांची खंडणी या आरोपीने विकासकाकडे मागितली होती. दोघांमध्ये झालेल्या तडजोडअंती 12.5 लाख रुपये देण्याचे ठरवले. त्यातील पहिल्यांदा 1 लाख रुपये विकासकाने गुडेकरला दिले होते.

मुंबई - गोवंडी येथील विकासकाकडे खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आज अटक केली. प्रशांत गुडेकर (46) असं या आरोपीचे नाव आहे. 80 लाखांची खंडणी या आरोपीने विकासकाकडे मागितली होती. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

गोवंडी येथील शिवाजी चाळ पोलीस चौकीजवळ विकासकाकडून एका चाळीच्या पुर्नविकासाचे काम सुरू होते. मागील काही दिवसांपासून प्रशांत हा विकासकाजवळ 80 लाख रुपयांची खंडणी मागत होता. पैसे न दिल्यास आरटीआय टाकून बांधकामात त्रुटींची तक्रार पालिका, एसआरएकडे तक्रार करून व्यत्यय आणू अशी धमकी आरटीआय कार्यकर्त्यांनी विकासकाला दिली. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली  कामाला स्थगिती मिळायची. त्यामुळे विकासकाचे काम अर्धवट राहिले होते. त्यातच रेरामुळे काम वेळेत न झाल्यास सर्व रहिवाशांना 18% प्रमाणे पैसे नियमानुसार पैसे द्यावे लागतील. त्यामुळेच विकासकने गुडेकरला पैसे देण्याची ठरवले. दोघांमध्ये झालेल्या तडजोडअंती 12.5 लाख रुपये देण्याचे ठरवले. त्यातील पहिल्यांदा 1 लाख रुपये विकासकाने गुडेकरला दिले होते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून गुडेकरने  विकासकाकडे पैशासाठी तगादा लावला होता. नेहमीच्या त्रासाला वैतागून आणि पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकाने या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली. विकासकाने 4 लाख रुपये घेण्यासाठी काल रात्री 10 वाजताच्या सुमारास गोवंडी शिवाजी महाराज चौकात गुडेकरला पैसे घेण्यासाठी बोलवले असताना.पोलिसांनी सापळा रचून गुडेकला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुडेकरवर गोवंडी पोलिसात भा. दं. वि. कलम 384, 385 कलमानुसार गुन्हा नोंदवत अटक केली आहे.

Web Title: Charges for RTI activist demanding ransom of Rs 80 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.