मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:32 PM2018-09-21T15:32:48+5:302018-09-21T15:33:22+5:30

Chargers for Manipuri students | मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला बेड्या

मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला बेड्या

Next

मुंबई - मुंबईत आपल्या युरोपीयन मित्रासोबत लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना उघडकीस अाली अाहे. पोलिसांनी या प्रकरणी २६ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अयाज सत्तार कुरेशी असं या आरोपीचं नाव असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे. 

११ सप्टेंबर रोजी हार्बर मार्गावरील वाशी ते गोवंडी स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. कुर्ला रेल्वे पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुंबईत शिकत अाहे. रेल्वे डब्यात गर्दीचा फायदा घेऊन अारोपीने तरूणीशी लगट करून छेडछाड केली. याप्रकरणी तिने सोमवारी वाशी रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तिच्याकडून घेतलेल्या आरोपीच्या फोटोवरून आणि इतर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम ३५४ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chargers for Manipuri students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.