Chains for two foreign nationals who sell cocaine | कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या 
कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या 

ठळक मुद्देनागरिकांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे.इनॉक मेरिट, जारचिंग ओकांटे डासील्वर आणि  प्रवीण बाबाजी पोटे अशी या आरोपींची नावे आहेत.

मुंबई -   नवघर पोलिसांनी कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या दोन परदेशी नागरिकांसह एक भारतीया नागरिकाला रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. इनॉक मेरिट, जारचिंग ओकांटे डासील्वर आणि  प्रवीण बाबाजी पोटे अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण एकूण २८ ग्रॅम कोकन पोलिसांनी हस्तगत केले आहे. यातील परदेशी नागरिक असलेल्या आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह अश्याच चार आणखी परदेशी नागरिकांना पोलिसांनी अवैध्यपणे भारतात राहण्याबाबत ताब्यात घेतले आहे. 

या आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराला पोलिसांनी नवी मुंबईतील कौपर खैरणे येथून अटक केली. त्याच्याजवळ १५.५ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले आहे. दोन्ही आरोपींकडून तब्बल २८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. दोन्ही विदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, त्यांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ड्रग्ज कुठून आले याबाबत पोलीस तपास करीत असून, मुंबईसह परिसरात त्यांचे इतर साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे.


Web Title: Chains for two foreign nationals who sell cocaine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.