सावधान..! परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:07 PM2018-12-15T17:07:25+5:302018-12-15T17:16:16+5:30

गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाईलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे...

Careful ..! 'Hello' from a foreign country can recover a big price. | सावधान..! परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो.. 

सावधान..! परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो.. 

Next
ठळक मुद्देमोबाईलवर ट्रु कॉलर अँप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणा-या फोनची कळते माहिती यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाईनवर देखील अशा प्रकारचे फोनलाखोंच्या फसवणूकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज

पुणे :  मोबाईलच्या पडद्यावर अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांच्या नावावरुन फोन आल्यास मनात एकीकडे कुतूहलाची भावना असली तरी दुस-या बाजुला या कुतुहलाची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाईलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाईनवर देखील अशा प्रकारचे फोन आल्याने नागरिकांनी विशेषत: मोबाईलवर आलेल्या फोनला उत्तर न देणे शहाणपणाचे ठरणार आहे. 
 कझाकिस्तान, टांझानिया, येमेन, थायलंड, अमेरिका इतकेच नव्हे तर पाकिस्तानमधून मोबाईल वर फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या मनात शंकेचे वातावरण तयार झाले आहे. मोबाईलवर ट्रु कॉलर अँप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणा-या फोनची माहिती कळते. मात्र आता बाजारात हँकिंगच्या अद्यावत सॉफ्टवेअरमुळे हँकर्सचे काम सोपे झाले आहे. मोबाईल धारकाने मोबाईलवर ट्रु कॉलर डाऊनलोड केल्यानंतर आपल्याबद्द्लची माहिती इ मेलव्दारे  आपल्याला पाठविली जाते. मेल वर रोज शेकडोच्या संख्येने  ‘‘स्पँम’’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलव्दारेच चॅटिंग करुन फसवणूक केली जाते. अनेकजण आपल्याला परदेशातून फोन येतो आहे या उत्साहातून तो फोन घेऊन आपल्याबद्द्लची सर्व माहिती फोन करणा-या व्यक्तीला दिल्याने त्यांना हजारो,लाखोंच्या फसवणूकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल होत आहेत. 
याविषयी अधिक माहिती देताना आयटीक्षेत्रात काम करणारे व सायबर अभ्यासक अनुप कवठाई यांनी सांगितले की, किमान सात ते आठ वर्षांपासून नायजेरिया देशांतून मोठ्या प्रमाणावर कॉल येत होते. या देशांमधील काही हँकर्स इतर देशांमधील लोकांना फोन करुन त्यांची फसवणूक करत असे. आता तर अँन्ड्रॉइड फोन मुळे हँकिंग करणे सोपे झाले आहे. ही सिस्टीम सहजासहजी ब्रेक करता येते. यावर उपलब्ध असलेल्या शेकडो अँपकरिता मेल आयडीचा अँक्सेस घेतला जातो. वाढत्या आणि बदलत्या टेक्नॉलोजीमुळे जगातून कुठेही, कुणाला फोन करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आपल्याला नायजेरिया किंवा तझाकिस्तान मधून फोन येतो आहे असे ट्रु कॉलरच्या मदतीने समजले तरी प्रत्यक्षातून कॉल भारतातील एखाद्या राज्यातून केला गेलेला आहे. याचा माहिती आपल्याकडे नसते. मात्र कुठल्याही स्वरुपात या कॉलला उत्तर देता कामा नये. उत्तर देण्याच्या निमित्ताने फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले दिसून येते. 

*  तो फोन घेऊच नका..
आपल्याला येणारा फोन हा फसवणूकीचा आहे असे कळल्यावर त्याला उत्तर न देणे हे शहाणपणाचे आहे. अनेकदा ज्येष्ठांबरोबर तरुण देखील फोन वरुन देण्यात येणा-या माहितीच्या अमिषाला बळी पडतात. त्यामुळे त्यांची लाखोची फसवणूक होते. सध्या इंटरनेटच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत ज्यामुळे भारतातून फोन करुन तो फोन अमेरिकेतून आल्याचे भासविण्यात येते. मात्र आपल्या मोबाईलच्या पडद्यावर जर दिसत अमेरिकेवरुन फोन आला आहे हे दिसत असताना संबंधित व्यक्ती तो फोन का उचलते हा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडीया आणि बनावट फोनच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रमाण वाढले असून त्याविषयी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. - जयराम पायगुडे (पोलिस निरीक्षक सायबर सेल) 
...............
 

Web Title: Careful ..! 'Hello' from a foreign country can recover a big price.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.