पोलिसाला मारहाण करून गालाचा चावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 06:42 AM2018-07-13T06:42:57+5:302018-07-13T06:43:07+5:30

महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Bribe by policing police | पोलिसाला मारहाण करून गालाचा चावा  

पोलिसाला मारहाण करून गालाचा चावा  

Next

मुंबई - महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंबोली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई असलेल्या अनसूया जाधव रात्री त्यांच्या सहकारी संगीता कांबळे (४६)सोबत गस्तीवर होत्या. दरम्यान अंधेरी महाकाली रोड परिसरातील हॉटेल बंद झाले असतानाही एक महिला तेथे उभी होती. कांबळे यांनी तिला हटकले आणि सुरक्षेच्या कारणास्तव तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र महिलेला राग आल्याने तिने वाद घालण्यास सुरुवात केली.

जाधव यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता, त्या महिलेने जाधव यांना मारहाण सुरू केली आणि त्यांना वर्दी उतरवून व बघून घेण्याची धमकी दिली. जाधव यांचे समजावणे सुरू असतानाच महिलेने त्यांना मारहाण करत जाधव यांच्या गालाचा कडकडून चावा घेतला. गालाला गंभीर जखम झाल्याने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलेने तेथून पळ काढला.

कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला. अद्याप कुणाला अटक केली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Bribe by policing police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.