राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 09:11 PM2018-09-21T21:11:26+5:302018-09-21T21:21:04+5:30

शालेय मुलीचे अत्याचाराचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Blackmail and rape on school girl, two people arrested at Rajgurunagar | राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देपोस्को व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गंभीर गुन्हा

राजगुरुनगर : कडूस (ता. खेड) येथील पंधरा वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून त्याचे अश्लील चित्रण  व्हायरल करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार घडत असून पोलिसांनीबलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अ‍ॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
सचिन रघुनाथ टोके (वय २०) आणि त्याचा साथीदार मयुर दगडु टोके (वय २३, दोघेही रा. कडूस) यांना खेडपोलिसांनी अटक केली आहे. खेड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मावस बहिणीसोबत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीला आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत सेल्फी फोटो काढला. हा फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात एकांतात नेऊन बलात्कार केला. यावेळी झाडाच्या आड लपून बसलेल्या मित्राने चित्रीकरण केले. 
त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांनी असेच आणखी फोटो डिलीट करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकांतात बोलवले. पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या सर्व प्रकाराचे तेथे लपून बसलेल्या मयूर टोके याने मोबाईलमध्ये चित्रीकरण  केले. यानंतर हा व्हिडिओ तिला दाखवत ब्लॅकमेल करण्यात आले. व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती घालत पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर वर्गामधील एका मुलीने आरोपीबरोबरचा अश्लिल व्हिडीओ पाहिल्याचे मुलीला सांगितले. या घटनेबाबतची कुजबूज होऊ लागली. ही चर्चा पिडीत मुलीच्या कानावर आल्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. अल्पवयीन मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
संशयित आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत.

Web Title: Blackmail and rape on school girl, two people arrested at Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.