खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 08:58 PM2018-08-02T20:58:25+5:302018-08-02T20:58:59+5:30

चालत्या गाडीतून उतरुन डान्स करत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर मुबंई पोलिसांचा कारवाईचा बडगा

Beware! If you do not dance ... Police raise awareness campaign against somebody | खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम 

खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम 

Next

मुंबई - चालत्या चारचाकी गाडीतून  खाली उतरत किकी डान्स करण्याच्या ट्रेंडचा चांगलाच बोलबाला सुरु झाला असून यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा डान्स करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अशा पकारे ट्वीट मुंबईपोलिसांनी करत किकि डान्सला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे.  

किकि चॅलेंजने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला असून भारतीय पोलिसांसाठीही हे चॅलेंज डोकेदुखी ठरले आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावर या चॅलेंजविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून लोकांना या चॅलेंजच्या आहारी न जाण्यासाठी आणि त्याबाबत सावधान राहण्यासाठी सल्ला देण्यात येत आहे. यासाठी मुंबई पोलीस, पंजाब पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी आपल्या ऑफिशअल ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. तसेच ट्विटरवरून #inmysafetyfeelingschallenge हा हॅशटॅग किकि चॅलेंजच्याविरोधात ट्रेंड सुरु  होत आहे.



 

 

Web Title: Beware! If you do not dance ... Police raise awareness campaign against somebody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.