जिवलग मित्रानेच कापला केसाने गळा; अशा विश्वासघातकी मित्राला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 10:56 PM2018-08-16T22:56:16+5:302018-08-16T23:59:42+5:30

दत्तात्रय गरगडे (वय - ३७) या आरोपीला पायधुनी पोलिसांनी सायन तलावासमोरून केली अटक

The best friend break faith; Police arrested that friend who looted 40 lakhs | जिवलग मित्रानेच कापला केसाने गळा; अशा विश्वासघातकी मित्राला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जिवलग मित्रानेच कापला केसाने गळा; अशा विश्वासघातकी मित्राला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next

मुंबई - काम करत असलेल्या कंपनीतील रोख रक्कम 40 लाख रुपये विश्वासाने नाथा नामदेव दळवी यांनी दत्तात्रय गरगडे या मित्राकडे ठेवण्यास दिले होते. मात्र इतकी मोठी रक्कम पाहता नियत फिरल्याने दत्तात्रय 40 लाख घेऊन पसार झाला. त्यानंतर हतबल झालेल्या नाथाने पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पायधुनी पोलिसांना आरोपीला फिर्यादीला ओळखत असल्याने अटक करणं सोपं झाल आणि आरोपी दत्तात्रयला सायन तलावसमोरील हिल व्युव्ह सोसायटी येथून पोलिसांनीअटक केली.

9 ऑगस्टची सायंकाळ नाथसाठी भयंकर त्रासदायक, मनस्ताप दवणारी ठरली होती. त्याचवेळी घामाघूम अवस्थेत घाबरलेल्या स्थितीत नाथाने पायधुनी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत सांगून तक्रार दाखल केली. नाथाने पोलिसांना मालकाच्या सांगण्यावरून काळबादेवी येथील व्यापाऱ्याकडून 40 लाख रुपये रक्कम घेऊन नाथा त्याच्याकडील स्कुटीने (एमएच 010,सीबी 5590) मस्जिद बंदर येथील सिद्धार्थ बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी पोचला. नाथाच्या हाताला दुखापत झालेली असल्याने त्याने आपल्याकडील 40 लाख रक्कम जिवलग मित्र दत्तात्रयकडे विश्वासाने सोपविली आणि त्याठिकाणी त्यांच्या ओळखीच्या काही माणसांसोबत बोलत असताना दत्तात्रयने नजर चुकवून स्कुटीसह रक्कम घेऊन पळ काढला. त्यानंतर नाथाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्या पथकाने कुंदापूरम कर्नाटक राज्य गाठले. मात्र गुप्त बतमीदारकडून दत्तात्रय सायन तलावाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत अवघ्या 72 तासात सायन तलावाजवळील हिल व्युव्ह येथून पायधुनी पोलिसांनी दत्तात्रयला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 39 लाख 92 हजार 500 रुपये जप्त केले आहेत.

Web Title: The best friend break faith; Police arrested that friend who looted 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.