बॉलिवुड नायिकेपेक्षाही सुंदर लेडी डॉन जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 01:32 PM2018-05-26T13:32:55+5:302018-05-26T13:32:55+5:30

भन्नाट सुंदर दिसणारी आणि शस्त्रे नाचवत, भरधाव वेगात बाइक चालवत, बेफाम जीवन जगणारी अस्मिता गोहिल उर्फ बा. लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बा'ला पोलिसांनी अटक केली आहे.

Beautiful Lady Don Arrested | बॉलिवुड नायिकेपेक्षाही सुंदर लेडी डॉन जेरबंद

बॉलिवुड नायिकेपेक्षाही सुंदर लेडी डॉन जेरबंद

googlenewsNext

बॉलिवुडमध्ये सर्वात हिट आणि हॉट मानल्या जाणाऱ्या कोणत्याही नायिकेपेक्षाही सुंदर मानली जाणारी अस्मिता गोहिल उर्फ बा अखेर जेरबंद झाली आहे. अस्मिताला महागड्या गाड्या चालवत शस्त्रांचे प्रदर्शन करत बेधडकपणे सोशल मीडियावर ते पोस्ट करण्याचाही शौक आहे. हातात तलावर घेऊन एकाच दिवशी सात ठिकाणी लुटमार केल्या, त्यापैकी एक सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाल्याने अखेर पोलिसांनी तिला अटक केली.

अस्मिता गोहिल उर्फ बा ही लेडी डॉन म्हणून ओळखली जाते. खरेतर अस्मिताचे वय फक्त २० वर्षे, मात्र तिला बा म्हटलेले आवडते. चांगले कपडे घालणे. बेफाम वागणे. गाडीही तशीच चालवणे. वेळच आली तर हातात शस्त्र घेऊन दहशत माजवणे. लूटमार करणे तिला आवडते असे म्हटले जाते. सुरतमध्ये काही भागांमध्ये तिची दहशत आहे. या लेडी डॉनचा तिच्या साथीदार मित्रासोबतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला होता. त्या व्हिडिओत अस्मिता बाइकवरुन आपल्या मित्रासोबत एका दुकानासमोरून वारंवार फेऱ्या मारताना दिसते. काही वेळानंतर ती दुकानासमोर येऊन थांबते. अस्मिता दुकानात जाताना दिसते. तेथे दुकानदाराला तलवारीचा धाक दाखवत पैसे लुटताना दिसते. त्यानंतर ती आणि तिचा साथीदार तेथून वेगाने निघून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सुरत पोलिसांनी लेडी डॉनचा शोध सुरु केला. तिला परवा तिच्या साथीदारासह अटक करण्यात आली.

लेडी डॉनविरोधात अनेक गुन्हे
अस्मिता गोहिलविरोधात नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा नाही. यापूर्वीही तिच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच तिच्या कारवायांचे व्हिडिओ याआदीही व्हायरल झाले आहेत. होळीच्या दरम्यान दोन गटांमध्ये दंगल झाली होती. त्यात अस्मिता ऑपल्या साथीदारांसह दुसऱ्या टोळीशी हाणामारी करताना दिसत होती. त्यातही ती शस्त्रांचा वापर करताना दिसली होती. त्यावेळीही तिला अटक झाली होती. मात्र सुटल्यानंतर तिने पुन्हा साथीदार जमवून कारवाया सुरु केल्या. 

शस्त्र आणि महागड्या बाइक्स हॉट फेवरेट
लेडी डॉन अस्मिता गोहिलला महागड्या बाइक्स आवडतात. तसेच रिव्हॉल्व्हर बाळगणे, त्यासोबत फोटो काढणे  आणि ते फेसबुकवर अपलोड करुन लाइक मिळवणे तिला खूपच आवडते. फेसबुकवर तिचे सध्या १२हजार फॉलोअर आहेत, तर तिने २५०० जणांनाच फेसबुक फ्रेंड म्हणून स्वीकारले आहे. 

Web Title: Beautiful Lady Don Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.