पिंपरीत मुलानेच आईला केली रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:38 PM2019-07-15T17:38:49+5:302019-07-15T17:39:33+5:30

घरगुती वादातून आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली.

beat to mother by iron rode in pimpri | पिंपरीत मुलानेच आईला केली रॉडने मारहाण

पिंपरीत मुलानेच आईला केली रॉडने मारहाण

Next

पिंपरी :  घरगुती वादातून पोटच्या मुलाने आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास सिध्दार्थनगर दापोडी येथे घडली.
  याप्रकरणी ५५ वर्षीय जखमी आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा अतुल नवनाथ डांगे (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल हा जखमी ५५ वर्षीय महिलेचा मुलगा आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास तो त्याच्या आईच्या घरात घुसला. तसेच घरगुती वादातून आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: beat to mother by iron rode in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.