Video : सतर्क रहा! सोसायटीच्या आवारात घुसून वृद्धेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:23 PM2019-05-31T19:23:46+5:302019-05-31T19:25:16+5:30

पोलीस दोन आरोपींचा शोध घेत आहेत.  

Be alert! Robbers has snatched gold chain of old age by entered the premises of the society | Video : सतर्क रहा! सोसायटीच्या आवारात घुसून वृद्धेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास 

Video : सतर्क रहा! सोसायटीच्या आवारात घुसून वृद्धेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास 

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्मला माने या आपल्या मैत्रिणीसह बसल्या असताना ही घटना घडली सोसायटीच्या बाहेर एक इसम दुचाकी घेवून उभा होता या दुचाकीवर बसून तेथून पळून गेला.

कल्याण - कल्याण येथील खडकपाडा परिसरातील कृष्ण नगरी या सोसायटीत येऊन चोरट्यांनी एका वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरी करून फरार झाला आहे. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस दोन आरोपींचा शोध घेत आहेत.  

कल्याण पश्चिम खडकपाडा येथे कृष्ण नगरी इमारतीमध्ये राहणाऱ्या निर्मला माने या ७७ वर्षीय महिला काल सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात आपल्या मैत्रिणीसह बसल्या असताना अचानक एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला एका क्षणात त्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवून तेथून पळ काढला आणि सोसायटीच्या बाहेर एक इसम दुचाकी घेवून उभा होता या दुचाकीवर बसून तेथून पळून गेला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Web Title: Be alert! Robbers has snatched gold chain of old age by entered the premises of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.