Attempting to carry the day-long unauthorized weapons in Thane | ठाण्यात दिवसाढवळ्या विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणारे अटकेत 
ठाण्यात दिवसाढवळ्या विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणारे अटकेत 

ठाणे - कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विश्वनाथ धुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख शिवमंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सर्व्हिस रोडवरून दोघांना विनापरवाना शस्त्र घेऊन वावरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

गायमुख शिवमंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सर्व्हिस रोडवर अग्निशस्त्र घेऊन दोन इसम येणार असल्याची धुर्वे त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार काशिनाथ जगन्नाथ कांबळे (वय - २५) आणि कृष्णा रामप्यारे जैस्वार (वय - २१) यांच्याकडून काल दुपारी १.२५ वाजताच्या सुमारास देशी बनावटीचे पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसं विनापरवाना बाळगल्याने अटक करण्यात आली आहे. तसेच ऍक्टिव्हा (एमएच ०४, एफजी ७५८७) हि दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. काशिनाथ हा राबोडी येथे राहणार असून कृष्ण उर्फ राजा हा ठाणे पश्चिमेकडील रॉयल सोसायटीत राहणार आहे. दोघेही बेरोजगार आहेत. या दोघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Web Title: Attempting to carry the day-long unauthorized weapons in Thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.