नशेसाठी चोरले पतपेढीचे लॉकर; मुलुंडमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 09:20 PM2018-08-17T21:20:11+5:302018-08-17T21:20:50+5:30

लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखेचा कक्ष - 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुफीयान अन्सारी (वय - 20), मुबारक शेख (वय - 19) अशी या दोघांची नावे आहेत.

For Addiction robbed locker; incident in Mulund | नशेसाठी चोरले पतपेढीचे लॉकर; मुलुंडमधील घटना 

नशेसाठी चोरले पतपेढीचे लॉकर; मुलुंडमधील घटना 

googlenewsNext

मुंबई - मुलुंडमधील सर्वोदय सहकारी पतपेढीतील लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखेचा कक्ष - 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुफीयान अन्सारी (वय - 20), मुबारक शेख (वय - 19) अशी या दोघांची नावे आहेत. नशेसाठी पैसे नसल्याने या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुलुंड परिसरात असणाऱ्या सर्वोदय सहकारी पतपेढी प्रसिद्धी आहे. 5 आँगस्ट रोजी पतपेढीतील सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे पतपेढी बंद करून निघून गेले. त्याच रात्री नशेसाठी पैसे नसल्यामुळे सुफीयान आणि मुबारक यांनी पतपेढी लुटण्याचा कट रचला. पतपेढीचे टाळे तोडून त्यांनी पतपेढीत शोधाशोध सुरू केली असता. त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर पतपेढीच्या आतल्या खोलीत असलेल्या लॉकरवर त्यांची नजर पडली. लॉकरची चावी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. अखेर एका कप्यात त्यांना कापडी पिशवीत बांधून ठेवलेले 289 रुपयांचे चिल्लर मिळाले. त्यानंतर दोघांनी काही किलो वजनाची ती तिजोरीच चोरून नेली होती. या तिजोरीत पतपेढीचे 14 लाख 38 हजार रुपये होतेे. 6 आरसीबुक होते. दुसऱ्या दिवशी पतपेढीचे व्यवस्थापक गिरीष साळवी यांनी नेहमीप्रमाणे पतपेढी उघडली असता त्यांना पतपेढीतील सामान अत्यावस्थ विखुरलेले निदर्शनास आले. त्याचबरोबर पतपेढीतील लॉकरही चोरीला गेल्याचे कळाल्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष - 7 कडे सोपवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना चोरी सुफीयान आणि मुबारक यांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: For Addiction robbed locker; incident in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.