अत्याचारी वयोवृध्दास ७ वर्ष कारावासाची शिक्षा; ठाणे न्यायलयाचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 03:18 PM2019-05-15T15:18:34+5:302019-05-15T15:37:26+5:30

जनार्दन कापसे (60) याला बुधवारी ठाणे जिल्हा न्यायलयाने 7 वर्ष कारावासाची  तसेच 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

7 year imprisonment for child torturing by 60 yrs old man; Result of Thane court | अत्याचारी वयोवृध्दास ७ वर्ष कारावासाची शिक्षा; ठाणे न्यायलयाचा निकाल 

अत्याचारी वयोवृध्दास ७ वर्ष कारावासाची शिक्षा; ठाणे न्यायलयाचा निकाल 

Next
ठळक मुद्देयुक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश कविता शिरभाते यांनी कापसे याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.ही घटना 16 डिसेंबर 2017 रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

ठाणे - सहा वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरात लैंगिक अत्याचार करणाऱ्या जनार्दन कापसे (60) याला बुधवारी ठाणे जिल्हा न्यायलयाने 7 वर्ष कारावासाची  तसेच 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही घटना 16 डिसेंबर 2017 रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील संजय मोरे यांनी तपासलेल्या पिडीत मुलीसह 10 साक्षीदारांची साक्ष, सदर केलेले पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश कविता शिरभाते यांनी कापसे याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

Web Title: 7 year imprisonment for child torturing by 60 yrs old man; Result of Thane court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.