दाबोळी विमानतळावर महिला प्रवाशाकडून ६ लाखांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:36 PM2019-03-20T19:36:24+5:302019-03-20T19:41:27+5:30

ह्या महीन्यात तीन वेगवेगळ््या कारवाईत कस्टम अधिकाऱ्यांनी ३४ लाख १५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त

6 lakh smuggled gold confiscated from woman passenger at Daboli airport | दाबोळी विमानतळावर महिला प्रवाशाकडून ६ लाखांचे तस्करीचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर महिला प्रवाशाकडून ६ लाखांचे तस्करीचे सोने जप्त

Next
ठळक मुद्देबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली असून ह्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.मार्च महीन्याच्या सुरवातीपासून अजून कस्टम अधिकाऱ्यांनी दाबोळी विमानतळावर तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ कीलो ३०० ग्राम वजनाचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये आहेत.

वास्को - आज (दि.२०) सारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबीया’ विमानातील एक महीला प्रवाशी संशयास्पद वागत असल्याचे आढळताच कस्टम अधिकाऱ्यांनी तीची झडती घेतली असता तिच्याकडून लपवून आणलेले ६ लाख ८६ हजार ८८२ रुपयांचे तस्करीचे सोने सापडले. मार्च महीन्याच्या सुरवातीपासून अजून कस्टम अधिकाऱ्यांनी दाबोळी विमानतळावर तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ कीलो ३०० ग्राम वजनाचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये आहेत.
बुधवारी (दि.२०) दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे सारजाहून आलेले विमान उतरल्यानंतर येथे प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका महीला प्रवाशावर संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी तिला बाजूला घेऊन तिची तपासणी करण्यास सुरू केली असता तिने अंगावर परिदान केलेल्या बुरख्यात चार सोन्याच्या बांगड्या लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. सदर सोन्याच्या बांगड्या कायदेशीर रित्या आणल्या आहेत काय याची चौकशी केली असता ह्या सोन्याच्या बांगड्या तस्करीने आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या कस्टम कायद्या खाली जप्त करण्यात आल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या चारही सोन्याच्या बांगड्या २३२ ग्राम वजनाच्या असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन याची एकूण रक्कम ६ लाख ८६ हजार ८८२ रुपये असल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली असून ह्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
दरम्यान ह्या महीन्याच्या सुरवातीपासून अजून पर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ किलो ३०० ग्राम सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये असल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. ह्या महीन्याचे पहीले तस्करीचे प्रकरण ६ मार्चला पकडण्यात आले असून यात कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाकडून ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणलेले ५९० ग्राम तस्करीचे सोने पकडले होते. ह्या तस्करी सोन्याची एकूण रक्कम १८ लाख ९ हजार ६८४ रुपये असल्याची माहीती यावेळी उघड करण्यात आली होती. १० मार्चला अन्य एका कारवाईत कस्टम अधिकाºयांनी एका प्रवाशाकडून पुन्हा एकदा ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणलेले ४७८ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले होते. याची किंमत ९ लाख १८ हजार ४७८ रुपये असून आज (दि.२०) करण्यात आलेली ह्या महिन्याची ही तिसरी कारवाई होती. ह्या तीनही प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

एप्रिल २०१८ ते अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर २ कोटी ७० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त
दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी ह्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत) अजून पर्यंत विविध तस्करीच्या प्रकरणात कारवाई करून विविध प्रवाशांकडून अजून एकूण २ कोटी ७० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. तसेच कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर विविध प्रवाशांकडून बेकायदेशीर रित्या नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेली ७५ लाख १४ हजार रुपयांची विदेशी चलने सुद्धा जप्त केली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे ११ दिवस राहीले असून दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाºयांकडून आणखीन केवढ्या कारवाई करण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: 6 lakh smuggled gold confiscated from woman passenger at Daboli airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.