४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:29 PM2019-01-25T15:29:15+5:302019-01-25T15:34:39+5:30

विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे(एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. 

4 officers are given the President's Police Medal whereas 40 officers, employees get Excellent Service Medal | ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

Next
ठळक मुद्दे उत्कृष्ट सेवा पदकाने पुणे शहर पोलीस दलातील चार, पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर उत्कृष्ट सेवा पोलीस पदक देऊन चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्या प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबई - राज्य पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर उत्कृष्ट सेवा पोलीस पदक देऊन चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्या प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवा पदकाने पुणे शहर पोलीस दलातील चार, पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर मुंबईतील १७ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवा पोलीस पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे(एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. 

राष्ट्रपती पोलीस पदक

१) बिपीन कुमार सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई

२) भास्कर एस. महाडिक, सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११, नवी मुंबई,

३) दिनेश भालचंद्र जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग, मुंबई

४) विष्णू जी. नागले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा रत्नागिरी

* उत्कृष्ट सेवा पोलीस पदक

१) गजानन डी. पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा पुणे

२) अशोक शंकर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा पुणे

३) लक्ष्मण कृष्णा थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा पुणे

४) सुनील बाळकृष्ण कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे

५) गणपतराव माडगुळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड 

६) दत्तात्रय तुळशीराम चौधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, भीगवण पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण

७) अरविंद टी. गोकुळे, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा

८) गिरीधर काशीनाथ देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ ग्रुप २ पुणे

९) शहाजी बी. उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - ५, चेंबूर मुंबई

१०) मनोज जी. पाटील, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण

११) सतीश बी. माने, पोलीस उपअधिक्षक, मुख्यालय, कोल्हापूर

१२) शरद एम. नाईक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायन विभाग, मुंबई शहर

१३) गणपत एच. तरंगे, सशस्त्र पोलीस निरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड

१४) मंगेश व्ही. सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिल्दाईघर पोलीस ठाणे, ठाणे शहर

१५) नितीन आर. अलकनुरे, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे, मुंबई शहर

१६) सचिन एस. राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,गुन्हे शाखा नवी मुंबई

१७) संजय व्ही. पुरंदरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर.

१८) नंदकुमार एम. गोपाळे, पोलीस निरीक्षक, खार पोलीस ठाणे, मुंबई शहर

१९) सचिन एम. कदम, पोलीस निरीक्षक खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा मुंबई

२०) धनश्री एस. करमरकर, पोलीस निरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, कुलाबा, मुंबई

२१) अनिल मारुती परब, सहायक पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

२२) अर्जून ज्ञानदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पालघर पोलीस ठाणे, पालघर

२३) सत्यवान महादेव राऊत, पोलीस उपनिरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई

२४) नंदकिशोर राजाराम शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा मुंबई

२५) विलास रघुनाथ मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर

२६) प्रदिप गोविंद पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, रायगड

२७) राजकुमार नथूजी वरुडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय, अमरावती शहर

२८) मोहन घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा

२९) पुरुषोत्तम बाळकृष्ण देशपांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, सातारा.

३०) अमरसिंग किशनलाल चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एम. टी. विभाग, औरंगाबाद ग्रामीण

३१) मनोहर बसप्पा खानगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.

३२) जाकीर हुसेन गुलाम हुसेन शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा नाशिक शहर

३३) गणपती यशवंत डफाळे, हेड कॉन्सटेबल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई

३४) कृष्णा हरिबा जाधव, हेड कॉन्सटेबल, खंडणी विरोधी विभाग, गुन्हे शाखा, मुंबई शहर

३५) पांडूरंग राजाराम तळवडेकर, हेड कॉन्सटेबल, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई शहर

३६) अर्जून महादेव कदम, हेड कॉन्सटेबल, कुरार पोलीस ठाणे, मालाड पुर्व, मुंबई शहर

३७) दयाराम तुकाराम मोहिते, हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा मुंबई शहर

३८) भानुदास यशवंत मानवे, हेड कॉन्सटेबल,विशेष शाखा १, सीआयडी

३९) दत्तात्रय पांडूरंग कुढाळे, हेड कॉन्सटेबल,गुन्हे शाखा, मुंबई शहर

४०) विनोद प्रल्हादराव ठाकरे, हेड कॉन्सटेबल, एम. टी. विभाग अकोला

Web Title: 4 officers are given the President's Police Medal whereas 40 officers, employees get Excellent Service Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.