३७ कोटी अमली पदार्थ जप्त; नवी मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 07:21 PM2018-08-04T19:21:18+5:302018-08-04T19:22:40+5:30

धक्कादायक बाब म्हणजे या पदार्थांची ओळख डिटर्जंट पावडर म्हणून कागदोपत्री दाखविले जात होती

37 crore drugs seized; DRI big action in Navi Mumbai | ३७ कोटी अमली पदार्थ जप्त; नवी मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई  

३७ कोटी अमली पदार्थ जप्त; नवी मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई  

Next

नवी मुंबई - नवी मुंबई परिसरातील रसायनी, तळोजा आणि कोपरखैरणे परिसरात महसूल गुप्तवार्ता महासंचालनालयाने (डीआरआय) 3 ऑगस्ट रोजी छापे मारले. या छापेमारीदरम्यान तब्बल 37 कोटी रुपयांचे अमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये 253 किलो केटामाईन आणि 12 किलो मेटाफेटामाईन जप्त करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा बेकायदेशीर धंदा मलेशियातून तस्करांची टोळी चालवत असल्याचे उघडकीस  आले आहे. याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता महासंचालनालयाने ७ जणांना बेडया आठोकळ्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या पदार्थांची ओळख डिटर्जंट पावडर म्हणून कागदोपत्री दाखविले जात होती.

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी सुशिक्षित तरुणांचा वापर करला जात होता. मलेशियातून अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी नवी मुंबईतील काही भागात गोडाऊन भाड्याने घेण्यात आली होती. त्याठिकाणी अमली पदार्थांची वाहतूक व साठवणूक केली जात होती. नवी मुंबईतील रसायनी येथील एका प्लान्टमध्ये केटामाईनची निर्मिती केली जात होती. या ठिकाणी बनविण्यात आलेले अमली पदार्थ कार्गोच्या माध्यमातून निर्यात केले जात होते. डीआरआयची हि मोठी कारवाई आहे. 

Web Title: 37 crore drugs seized; DRI big action in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.