काणकोण/पणजी : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी पोळे-काणकोण येथे चेकनाक्यावर ३0 लाख रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला. केए-0५-एजी-६२0७ क्रमांकाच्या ट्रकमधून तंबाखूच्या २00 गोणी मडगाव येथे आणल्या जात होता. काणकोण पोलिसांकडून ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना झाले. चेन्नई येथून आणलेला हा तंबाखू मडगाव येथे पुरविला जाणार होता. कारवाई करणा-या पथकात कोरडे यांच्याबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी अमित नाईक, अटेंडंट साईनाथ मांद्रेकर सहभागी झाले.