सिडनी : अचानक तुमचं अकाऊंट क्रेडीट झालंय असा तुम्हाला मॅसेज आल्यावर तुम्हाला किती आनंद होईल? एवढंच कशाला वेळेच्या आधी तुमच्या खात्यावर तुमचा पगार आलाय असा मॅसेज जरी आला तरी प्रत्येकाला आनंद होतो, मग आपल्या खात्यात ३० कोटी अचानकपण जमा झाले आहे असं कळलं तर काय होईल? या सगळ्या कल्पना एखाद्या स्वप्नासारख्या वाटत असल्या तरीही मलेशियात राहणाऱ्या एका तरुणीच्या बाबतीत ही कल्पना खरी ठरली आहे. बरं, तुम्हाला एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय कराल? नातेवाईंकाना, मित्र-मंडळींना सांगाल? या तरुणीने कोणालाच कल्पना न देता हवी तेव्हढी शॉपिंग करून घेतली. पण जेव्हा खरी गोष्टी तिच्या लक्षात आली तेव्हा मात्र ही तरुणी चांगलीच गोत्यात सापडली. 

मलेशियात राहणारी पण सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी एक विद्यार्थीनी क्रिस्टीन ली हिच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. २०१२ साली तिने एक बँक अकाऊंट उघडलं होतं. ज्या अकाऊंटमध्ये ती जास्त पैसे टाकत नसे. पण बँक कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे तिच्या खात्यात तब्बल ३० कोटी रुपये जमा झाले. बँकेच्या चुकीमुळे या खात्याला ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली होती, त्यामुळे या खात्यात ३० कोटी रुपये जमा झाले. पण ही चुक बँकेच्या लक्षात आली तेव्हा त्या खात्यातून ३० कोटी वजा झालेले होते. 

या खात्याची खातेदार क्रिस्टन ली हिला आपल्या खात्यात पैसे आले असल्याची माहिती मिळताच कसलीच शहानिशा न करता भरपूर शॉपिंग केली. या पैशांपासून तिने १०० हून अधिक डिझायनर्स बॅग, कपडे, दागिने आणि बाकीच्या वस्तू खरेदी केल्या. हा सगळा प्रकार घडला तो २०१५ साली. आणि २०१६ साली बँकेचा हा प्रकार लक्षात आला. आणि आता हा प्रकार उजेडात येण्यामागेही तसंच कारण आहे. या तरुणीला अटक झाल्यानंतर ती निर्दोष असल्याचं सिद्ध झालंय. तिच्यावर कोणतीही कारवाई होणार नाहीए. एवढंच नाही तर तिला आता उधळलेले पैसेही परत करावे लागणार नाहीएत. आहे की नाही मजेशीर बातमी. 

२०१६ साली बँकेचा हा प्रकार लक्षात येताच क्रिस्टन लीवर कारवाई करण्यात आली. ती मलेशियाला जात असताना तिला सिडनी एअरपोर्टवर अटक करण्यात आली. यानंतर तिच्याविरोधात बरेच दिवस खटला सुरू होता. पण आता ती या सगळ्या आरोपातून मुक्त झाली आहे. तिच्या अकाऊंटमध्ये चुकून ट्रान्सफर झालेले पैसे ही बँकेचीच चूक होती. त्यामुळे संबंधित तरुणीवर कारवाई करणं गैर असल्याचं निष्पन्न झाल्यानं तरुणी आणि तिचे वकील ह्युगो एस्टन अत्यंत आनंदात आहेत. तसंच, तिला कोणतेही पैसे बँकेत भरावे लागणार नाहीएत. याचा अर्थ तीच त्या ३० कोटींची मालकीण होती, हेच एका अर्थानं सिद्ध झालंय.हा चमत्कार प्रत्येकाच्याच बाबतीत घडतो असं नाही. पण असा चमत्कार आपल्याही बाबतीत घडावा असं प्रत्येकाला वाटत राहतं. पण क्रिस्टन ली याबाबतीत अपवाद ठरली असं म्हणायला हरकत नाही. 

आणखी वाचा - बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात